विवरे बुद्रुक उपसरपंच निवडीत बहुमत असलेल्या गटाला झटका

भाग्यश्री पाटील यांची वर्णी
विवरे बुद्रुक उपसरपंच निवडीत बहुमत असलेल्या गटाला झटका
उपसरपंच भाग्यश्री पाटील यांचा सत्कार करतांना सहयोगी सदस्य

रावेर|प्रतिनिधी Raver

तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे.बहुमत असलेल्या गटातील एक सदस्य विरोधी गटाला जाऊन मिळाल्याने,उपसरपंचपदी विरोधी गटाची वर्णी लागल्याने,गावात तणावपूर्ण शांतता आहे,

येथील विवरे बुद्रुक ग्रामपंचायतीत सरपंच गटात ७ तर विरोधी गटाकडे ८ सदस्य होते.यातील सरपंच गटाचे नेतृत्व माजी सरपंच वासुदेव नरवाडे,जनार्दन पाचपांडे यांच्याकडे आहे तर दुसऱ्या गटात ८ सदस्य होते.त्यांचे पॅॅनलप्रमुख विपिन राणे,शिवाजी पाटील आहे.नीलिमा सनंसे यांची एक महिन्यासाठी उपसरपंच पदी निवड करण्यात आली होती.त्यांच्या राजीनाम्यानंतर विनोद मोरे यांचे नांव फिक्स करण्यात आले होते.

यासाठी गुरुवारी बोलवण्यात आलेल्या विशेष बैठकीत हि निवडणूक घेण्यात आली.यासाठी विनोद मोरे व मनीषा पाचपांडे यांचा अर्ज विपिन राणे व शिवाजी पाटील यांच्या मार्फत भरण्यात आला होता. ऐनवेळी त्यांच्याच गटातील सदस्या भाग्यश्री पाटील यांचा अचानक उमेदवारी दाखल झाला.यावर सूचक म्हणून विरोधी गटातील सदस्य वासुदेव नरवाडे यांची सही होते.तिसरा अर्ज आल्याने वातावरण चांगलेच तापलेले होते.यावेळी झालेल्या निवड प्रक्रियेत भाग्यश्री पाटील यांना ८ तर विनोद मोरे यांना ७ मते पडल्याने,भाग्यश्री पाटील यांची उपसरपंचपदी वर्णी लागली आहे.निवडणुकीनंतर विपिन राणे,शिवाजी पाटील व त्यांच्या गटातील सदस्य बाहेर पडले,तर सरपंच युनुस तडवी,सदस्य वासू नरवाडे,युसुफ खाटिक,

नौशादबी इस्माईल,ललिता पाचपांडे,रेखा गाढे,ज्योती सपकाळ यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन केले.निवडीसाठी ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते यांचे सहकार्य लाभले.

वासुदेव नरवाडे व माजी सरपंच जनार्दन पाचपांडे यांच्या गटात ७ सदस्य होते.यातील युनुस तडवी अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेले असल्याने,सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली,मात्र समोरील विपिन राणे व शिवाजी पाटील यांच्या गटात ८ सदस्य असल्याने त्यांच्या गटातील नीलिमा सनंसे यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली होती.यात वासुदेव नरवाडे यांचा पराभव झाला होता.मात्र महिनाभरानंतर विपिन

राणे,शिवाजी पाटील यांनी नीलिमा सनंसे यांचा राजीनामा घेत,यापदावर विनोद मोरे यांचे नांव निश्चित केले.यासाठी गुरुवार दि.६ रोजी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले.राणे व पाटील यांचा एक सदस्य फुटून त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागल्याने,आता सरपंच व उपसरपंच एकाच गटातील आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com