माझी वसुंधरा अभियानात अडावद ग्रामपंचायतीची निवड

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनावर निर्मूलनावर भर
माझी वसुंधरा अभियानात अडावद ग्रामपंचायतीची निवड

अडावद ता.चोपडा Chopada

पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश आणि जल या पंचमहाभूतांनी निर्मित 'माझी वसुंधरा' अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत राबविण्यात येत असून, यात ग्रामपंचायत अडावदची या अभियानांतर्गत निवड झाली आहे. पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना राबवून शाश्वत निसर्गपूर्वक जीवनपद्धती अवलंबन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात.

१५ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, सांडपाणी व्यवस्थापनचे तज्ज्ञ योगेश राऊत, डि. एम. राजपूत, सहायक गटविकास अधिकारी जे.पी.पाटील, जलजीवन व्यवस्थापनचे तालुका समनव्यक पांडुरंग कंबलेव्ही सचिन पाटील यांनी गावातील सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी वटार रस्त्याकडील व वडगाव बु. रस्त्यावरील जागांची पाहणी केली.

नंतर ग्रामपंचायत कार्यालयात तज्ज्ञांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीकरिता जनतेचा सहभाग हवा याकरिता जनतेचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळाले तर अडावदचा कायापालट होईल असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, ग्रामपंचायत सदस्य हनुमान महाजन, रियाजअली सैय्यद, सचिन महाजन, जावेद खान, अनिल देशमुख, वासुदेव महाजन, जुनेद खान, रामकृष्ण महाजन, ग्रामविकास अधिकारी व्ही. एस. साळुंखे, वरिष्ठ लिपिक आनंदा महाजन, लिपिक प्रेमराज पवार, पुरुषोत्तम महाजन यांची उपस्थिती होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com