महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

परिक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रवेशास बंदी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

जळगाव - jalgaon

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मुंबई (Mumbai) यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2020 शनिवार, दि. 4 सप्टेंबर, 2021 रोजी रोजी सकाळी 11.00 ते 12.00 यावेळेत जळगाव शहरातील एकूण 35 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.

या परिक्षेच्यावेळी कोणताही गैरप्रकार होवू नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून 4 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जळगाव शहरातील एकूण 35 उपकेंद्रावर जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत (District Magistrate Abhijeet Raut) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) लागू केले आहे.

या परिक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. हे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही. त्याचबरोबर सर्व सबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यास पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे प्रकल्प 144 (2) नुसार हे आदेश एकतर्फी काढण्यात येत असल्याचेही जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com