...तर ‘ब्रेक द चेन’ कशी होणार

दहा दुकानांना सील ; मनपा उपायुक्त संतोष वाहुळेची कारवाई
...तर ‘ब्रेक द चेन’ कशी होणार

जळगाव - Jalgaon

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बे्रक द चेनसाठी कडक निर्बंध लागू केले असून १५ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी सकाळी ७ ते ११ पर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे.

मात्र यावेळी देखील शहरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर अशी गर्दी केली तर ब्रेक द चेन कशी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, निर्धारित वेळेपेक्षा सुरु असणार्‍या आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या ११ दुकानांवर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सीलची कारवाई केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com