<p><strong>जळगाव - jalgaon</strong></p><p>शहरातील मंगल कार्यालयांमध्ये खुद्द जिल्हाधिकारी यांनी आज पाहणी केली. पाहणीत कुठल्याही प्रकारे कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले.</p>.<p>त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येवून जळगाव शहरातील सहा मंगल कार्यालये सील करण्यात आले आहेत. यात दापोरेकर मंगल कार्यालय, यश लॉन, लाडवंजारी मंगल कार्यालय, क्रेेझी होम, निराई लॉन, कमल पॅराडाईज या मंगल कार्यालयांचा समावेश आहे. कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.</p>