शाहूमार्केटमधील चार दुकाने सील

थकबाकीपोटी महापालिकेची कारवाई : ६२ लाखांची वसुली
शाहूमार्केटमधील चार दुकाने सील

जळगाव jalgaon

महापालिका Municipal Corporation मालकीच्या मुदत संपलेल्या २० व्यापारी संकुलातील गाळ्यांची थकबाकी वसुली Recovery of arrears मोहिम मनपा प्रशासनाने पुन्हा सुरु केली आहे. मंगळवारी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत शाहू मार्केटमध्ये Shahu Market थकबाकीपोटी चार दुकाने सील Seal the shops करण्यात आली आहेत. तसेच ६२ लाखांची धनादेशाव्दारे वसुली करण्यात आली आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून गाळेधारकांकडे थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे मनपा गाळेधारक संघटनेकडून अवाजवी बिले बजावण्यात आल्याचा आरोप गाळेधारक संघटनेकडून केला जात आहे. गाळ्यांचा प्रश्‍न निकाली काढण्याच्या मागणीसाठी मागील महिन्यात संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नगरविकास मंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र शासनाने थकबाकीपोटी पाच पट दंड आणि शास्ती वगळता उर्वरीत रकमेतील किमान, ५० टक्के वसुली करावी, अशा सुचना दिल्या होत्या.

शासनाच्या सुचनेनुसार मंगळवारी महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त प्रशांत पाटील, किरकोळ वसुली अधीक्षक नरेंद्र चौधरी, संजय ठाकूर, बुडन खान, शंकर बागल यांच्यासह पथक शाहू मार्केटमध्ये वसुलीसाठी गेले होते.

दरम्यान थकबाकीपोटी चार दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली असून अन्य गाळेधारकांकडून धनादेशाव्दारे ६२ लाखांची वसुली करण्यात आली आहे.

गाळेधारकांचा कारवाईला विरोध

महापालिकेचे पथक शाहू मार्केटमध्ये पोहचल्यानंतर सीलच्या कारवाईला सुरुवात केली. कारवाई सुरु असतांनाच मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, तेजस देपुरा, राजस कोतवाल यांच्यासह काही पदाधिकारी पोहचले. त्यांनी कारवाईला विरोध केला. त्यामुळे गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला होता.

" मनपा प्रशासनाकडून चुकीची कारवाई केली जात आहे. हेतुपुरस्कर शाहू मार्केटमध्ये कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेचे अधिकारी गाळेधारकांवर दबाव टाकून धनादेश घेत आहेत. या कृतीच्या विरोधात गाळेधारकांच्या कुटुंबियांसह आंदोलन करण्यात येईल ."
- डॉ. शांताराम सोनवणे, अध्यक्ष, मनपा गाळेधारक संघटना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com