जिल्ह्यात 306 माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष

नियमांचे पालन करत अध्यापनाला सुरुवात; दीड वर्षानंतर शाळांची घंटा वाजली
जिल्ह्यात 306 माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या दीड वर्षांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरु होते.

करोनाच्या लाटेचा कहर काही प्रमाणात मंदावल्याने राज्यात करोनामुक्त गावांमध्ये इयत्ता 8 वी ते 12वी पर्यंत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यतील करोनामुक्त गावांमध्ये 306 शाळा उघडण्यात आल्या आहेत.

दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करीत तसेच करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन अध्यापनाला सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील 708 माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात त्या कोरोनामुक्त गावांमधून सरपंच,तलाठी यासह गाव कमिटी ठराव मागविण्यात आलेले होते. जिल्ह्यातील 15 पैंकी 14 तालुक्यातील ठराव केलेल्या कोरोनामुक्त गावांतील शाळा उघडण्यात आल्या आहेत. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंद पाहण्यास मिळाला. गेल्या दीड वर्षानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी वर्ग खोल्यांमध्ये बसून अध्यापनाचा आनंद लुटला.

शाळांच्या प्रवेशद्वारावरच स्वागत अन् तपासणी

कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नियमांचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्यांचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज दि.15 जुलैपासून कोरोनामुक्त गावांतील शाळांची घंटा वाजली. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करताच प्रवेशद्वारावर त्यांची तापमान मोजून सॅनिटायझर करण्यात आले. त्यानंतर काही शाळांमध्ये गुलाबपुष्प तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील 306 शाळांमध्ये 10 हजार 271 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

रावेर तालुक्यातील शाळा बंदच

जिल्ह्यातील जिल्ह्यातील 708 शाळांपैकी 306 गावांतील माध्यमिक शाळांनी ठराव दिल्यानेच या ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, रावेर तालुक्यात 54 शाळा असून या गावांमधील कोरोनामुक्त गाव झाल्याबाबत ठराव न केल्याने रावेर तालुक्यतील इयत्ता 8 वी ते 12 वीपर्यंत च्या 54 शाळा बंदच आहेत. रावेर तालुक्यात एकही गाव कोरोनामुक्तचा ठराव न केल्याने शाळा सुरु करण्यात आली नसल्याची माहिती रावेरचे शिक्षण विस्तार अधिकारी शैलेश दखने यांनी दै.‘देशदूत’शी बोलताना दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com