सीडॅकच्या प्रवेश परिक्षेत सौरभ महाजन देशात पहिला

सीडॅकच्या  प्रवेश परिक्षेत सौरभ महाजन देशात पहिला

सावदा Savada ।

येथील गांधीचौकतील रहिवाशी सौरभ महाजन Saurabh Mahajan याने सीडॅकच्या प्रवेश परिक्षेत (सीसीएटी) CEDAC entrance exam देशातून प्रथम क्रमांक पटकावला . या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात सौरभ महाजन याने देशातून पहिला first क्रमांक संपादन केला आहे.

त्याने भारती विद्यापीठातून डिप्लोमा तर सिंहगड इन्स्टीट्युटमधून बी.ई. केले आहे. यानंतर आता तो सीडॅक संस्थेतून अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. . यशाबद्दल त्याचे माजी आमदार रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राष्ट्रवादीचे गटनेते फिरोजखान पठाण, माजी नगरसेवक सुधाकर पाटील, सुनील पाटील यांच्यासह गांधी चौक मित्रमंडळाने कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com