चक्क घोड्यावरच बसून महाराज तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात

चक्क घोड्यावरच बसून महाराज तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पोलीस ठाणे म्हटले की, दिवसभरात अनेक जण तक्रारीसाठी येत असतात. मात्र आज सोमवारी चक्क घोड्यावरच बसून एक महाराजने त्याच्या गायी मिळवुन देण्याबाबतच्या तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले.

घोड्यावर बसून आरडाओरड करणार्‍या महाराजची कुणीही दाद घेतली नाही. दरवेळीप्रमाणे आजसुध्दा या महाराजला कुठलीही कारवाई न होता रिकामे परतण्याची वेळ आली.

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहू नगरात एका महाराज वास्तव्यास आहेत. त्याच्या काही दिवसांपूर्वी दहा ते बारा गायी या एका व्यक्तीने घेतल्या आहेत. त्या गायी परत मिळवून देण्यासाठी संबंधित महाराज दोन ते तीन वेळा तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात आला मात्र त्याची तक्रार घेण्यात आली नाही. गायी मिळवून देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले.

गायी मिळत नसल्याने संतापात संबंधित महाराजने आज सोमवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. व घोड्यावरुन गायी मिळवून देत नसल्याबाबत रोष व्यक्त केला. व माझ्या सर्व गायी मला परत मिळवून देण्याची विनंतीही कर्मचार्‍यांना केली.

यात एका कर्मचार्‍याने संबंधित महाराजला आता साहेब नाही. साहेब असतांना सकाळी या, असे सांगितले. संतापात आलेले महाराज रिकाम्या हाताने परत निघून गेले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com