संत मुक्ताबाई पादूका स्वस्थळी विराजमान
जळगाव

संत मुक्ताबाई पादूका स्वस्थळी विराजमान

काल्याचे कीर्तनाने आषाढी वारीची सांगता

Rajendra Patil

मुक्ताईनगर | Muktainagar

आषाढी परतवारी संत मुक्ताबाई पादूका‌ पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादूका विराजमान करून काल्याचे कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.

दरवर्षी संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी व पंचक्रोशीतील भाविकांचे सहभागातून भव्य आणि दिव्य साजरा होतो. दिंडी स्पर्धांमध्ये दिडशेवर भजनी मंडळ सहभागी होत असतात. परंतू यावेळी कोरोना महामारी चे पार्श्वभूमीवर सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील, आ.चंद्रकात पाटील, नरेंद्र नारखेडे, योगेश भावसार, कोथळी उपसरपंच उमेश राणे, बारसु खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विनायक पाटील, श्रीकांत पाटील, विशाल सापधरे, सम्राट पाटील, छोटू भोई, संतोष मराठे, मुक्ताई फडावरील महाराज मंडळी व भाविक उपस्थित होते. निना काठोके यांनी महाप्रसाद सेवा दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com