महापौरांनी राबविले स्वच्छता अभियान

साडे तीन तास साफसफाई
महापौरांनी राबविले स्वच्छता अभियान

जळगाव : Jalgaon

संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लाडके दैवत अर्थात गणपती (Ganpati) बाप्पाचे शुक्रवार, दि.10 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी घरा-घरांत अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले.

त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते महाराणा प्रताप चौक म्हणजेच रिंग रोड परिसर, टॉवर चौकाजवळील महात्मा गांधी रोड, अजिंठा चौक, पिंप्राळा या भागांत महापालिकेच्या परवानगीने याहीवर्षी बुधवार, दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी दुपारपासून शुक्रवार, दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी रात्रीपर्यंत गणेशमूर्ती, पूजा साहित्य, प्रसाद, सुशोभीकरणासह पुष्पहार, विविध फळे यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली होती. मात्र, संबंधित विक्रेत्यांनी मालाच्या विक्रीनंतर आपापल्या दुकानातील कचरा, निर्माल्याची विल्हेवाट न लावता तो तेथेच रस्त्यावर टाकलेला होता.

त्यामुळे आधीच (corona) ‘कोरोना’चे संकट आणि सतत कोसळणार्‍या पावसामुळे रोगराई उद्भवून त्या-त्या भागातील रहिवासी, नागरिकांपुढे कोणत्याही प्रकारे आरोग्याचा प्रश्न उभा राहू नये तसेच महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केलेला जळगाव शहर सुंदर अन् स्वच्छतेत सदैव अग्रेसर राहावे, हा संकल्प लक्षात घेऊन स्वजबाबदारी पार पाडण्यासाठी महापौर जयश्री सुनिल महाजन (Mayor Jayashree Sunil Mahajan) या स्वतः आज शनिवार, दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास हातात झाडू, फावडा घेऊन रस्त्यावर उतरल्या अन् शहर स्वच्छतेचे हे अभियान त्यांनी संबंधित चौक परिसराच्या ठिकाणी जाऊन राबविले. जवळपास तीन-साडेतीन तासांपर्यंत हे अभियान राबविण्यात येऊन संबंधित कचरा, निर्माल्याची महापालिकेच्या ट्रॅक्टर, घंटागाडी आदी वाहनांच्या मदतीने विल्हेवाट लावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com