चाळीसगाव : रहिपुरी धरण परिसरातून लांखो रुपयांची वाळू चोरीस

वाळू चोरीच्या गंगेत वाळू चोरटे व महसूलातील कर्मचार्‍यांचा आर्थिक संगम
चाळीसगाव : रहिपुरी धरण परिसरातून लांखो रुपयांची वाळू चोरीस

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीत एकीकडे तालुक्यात रुग्णांचे जीव जात असताना, दुसरीकडे मात वाळू चोरट्यांकडून गिरणेचे वस्त्रहरण सुरुच ठेवले आहे. तालुक्यातील रहिपुरी धरण परिसरातून दररोज लांखो रुपयांची वाळू चोरी होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. तर वाळू चोरीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून गावाच्या सिंचनाचा विचार न करता वाळू चोरीसाठी मनाने ‘ बीड ’ झालेल्यासह चार ते पाच वाळू चोरट्यांचा समावेश आहे. तर आपल्या कामात प्रामाणिकपणा न दाखवता वाळू चोरट्यांकडून आर्थिक लाभासाठी वाळू चोरट्यांना ‘लोखांडा’ सारखी साथ देणारा एक महलूसच्या कर्मचार्‍यांचा हात वाळूच्या आर्थिक कणांमध्ये रुतले आहेत.

या दोघांचा रहिपूरीच्या वाळू चोरीच्या गंगेत गेल्या अनेक दिवसांपासून ‘ आर्थिक संगम ’ झाला असून दोघांचा संगमताने दररोज लांखो रुपयांची वाळू बैलगाडी व ट्रक्टरव्दारे चोरली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे चोरीच्या वाळूचे ठिकठिकाणी ढिग करुन ठेवण्यात आले असून त्यांची विक्री सद्या होत असल्याची चर्चा वाळू चोरट्यांमध्येच आहे.

तालुक्यातील मेहुणबारे व भोरस परिसरातून वाळू चोरीत अक्षरशा: कहर केला असून कोरोडो रुपयांची वाळू चोरी गेल्या अनेक दिवसांमध्ये झाली आहे. तर तालुक्यातील रहिपुरी धरण परिसरातून देखील लांखो रुपयांची वाळू चोरी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोरोना महामारीमुळे महसूल प्रशासनास कारवाई करण्यात काही प्रमाणात मनुष्यबळा अभावी अडचण निर्माण होत असल्यामुळे वाळू विरोधात मोहीम काही प्रमाणात थंड पडल्याने वाळू माफियांना हिच संधी साधत बेभान वाळू चोरी केली आहे. मात्र रहिपुरी धरण परिक्षेत्रात महसूल मधील काही कर्मचार्‍यांच्या आर्शिवादानेच वाळू चोरी होत असल्याची चर्चा आहे. मेहुणबारे व भोरस परिसरातून करोडा रुपयांची आतापर्यंत वाळू चोरली गेली आहे. तर त्यापाठोपाठ रहिपुरी धरण परिसरातून देखील लांखो रुपयांची दररोज वाळू चोरी होत आहे. रहिपुरी धरण परिसरात जवळपास पाच ते सहा वाळू चोरटे निरढावळे आहेत.

ते राजरोसपणे मिळेल त्या वाहनाद्वारे वाळू चोरून, ती चढ्या भावाने विक्री करीत आहेत. कारवाई करणारी यंत्रणाच गायब व फुटीर झाल्याने गिरणा पात्रात वाळू चोरटेे बेभान झाले असून गिरणा नंदीपात्रातून करोडा रुपयांची वाळू चोरली जात आहे. रहिपुरी धरण परिसरातील वाळूचोरट्यांचा मोरख्या ‘ बीड ’ सारखा भक्कम असून त्याला महसूलातील एक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून लोखडांसारखी साथ लाभल्याची चर्चा वाळू चोरट्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे वाळू चोरट्यांना ‘ लोखांडा’ सारखी भक्कम साथ देणार्‍या कर्मचार्‍याला प्रत्येक ट्रक्टरमागे महिन्याचे विशेष पॅकेज ठरलेले आहे. तर चालकास देखील ‘ टिप ’ देण्यासाठी विशेष नजराना दरमाहा दिला जात असल्याची चर्चा वाळू चोरट्यांमध्ये आहे.

रहिपुरी धरण परिसरातून वाळू चोरुन, वाळूचे ठिकठिकाणी ढिगारे करुन ठेवण्यात आले असून त्यांची विक्री खेडगाव, कळमडू, पोहरे, न्हावे आदि गावांमध्ये तसेच परिसरात केली जात असल्याची चर्चा आहे. तर चाळीसगावचे काही वाळू चोरट्ये देखील ‘ तंग ’ वातावरणात त्यांच्याकडून वाळू घेवून, शहरात वाळूची विक्री करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता वाळू चोरट्यांविरोधात महसूल प्रशासनाने थेट गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे, तसेच महसूल मधील वाळूसाठी आपले इमान विकणार्‍या कर्मचार्‍यांवर देखील कारावाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. आता या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाला न जुमानता वाळू चोरट्यांविरोधात पोलीस प्रशासनाने आता एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.

बदनामीसाठी जबाबदार कोण ?

गेल्या वर्षभरात महसूल प्रशासानकडून अवैद्य वाळू वाहतूक प्रकरणी १६५ वाहनावर कारवाई केली असून पोलीसात ८ गुन्हे दाखल केले आहेत. अवैद्य वाळू वाहतुक प्रकरणी तब्बल ६३ लाख ३७ हजार ६९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक वाळू विरोधात कारवाई चाळीसगाव तालुक्यात झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातून सर्वाधीक वाळू चोरी होत असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘ चाळीसगाव तालुका ’ हा वाळू चोरीसाठी पूर्णता; बदनाम झाला असून याला जबाबदार कोण ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून वाळू चोरी संबंधीत सर्वांवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com