चाळीसगाव : मेहुणबारे परिसरात करोडो रुपयांची वाळू चोरी

पोलीस, महसूल प्रशासानाच्या आशीर्वादाने हाेतेय वाळू चोरी, काय आहे, वाळू चोरीचेे प्रभाकर-राज , कर्मचार्‍यांकडून वाळू चोरट्यांना टिप्स, स्पेशल पथक नेमण्याची गरज
चाळीसगाव : मेहुणबारे परिसरात करोडो रुपयांची वाळू चोरी

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे नागरीक भयभित झाले असतांना, दुसरीकडे मात्र मेहुणबारे परिसरात वाळू माफियांसाठी ही मोठी संधी ठरली असून वाळू चोरीत त्यांनी चांदी केली आहे. चाळीसगावातील माजी नगरसेवकासह पोलिसांतील ‘ चकोर ’ बुध्दीचे काही आधिकारी व कर्मचारी हे वाळू चोरीला खतपाणी घालत, लॉकडाऊनमध्येच गबर झाले आहे. या पोलीस व महसूल विभागातील फुटीर कर्मचार्‍यांमुळेे मेहुणबारे परिसरात वाळू चोरीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाकर-राज चालू असल्याची चर्चा आहे. मागील विकेड लॉकडाऊनमध्ये लांखो रुपयांची वाळूची चोरी झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. परंतू फुटरवादी कर्मचार्‍यांमुळे ग्रामस्थखुले आम बोलण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून, जिल्ह्यातूनच वाळू चोरीला आळा घालण्यासाठी गस्ती पथक नेमावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होवू लागली आहे.

गिरणा नदीपात्रात गेल्या काही दिवसापासून वाळू चोरांच्या विरोधात मोहीम एकदम थंड पडल्याने वाळू माफियांना अक्षरशा उधान आले आहे. राजरोसपणे मिळेल त्या वाहनाद्वारे वाळू चोरून, ती चढ्या भावाने विकली जात आहे. कारवाई करणारी यंत्रणाच गायब व फुटीर झाल्याने गिरणा पात्रात वाळू चोरटेे बेभान झाले असून गिरणा नंदीपात्रातून करोडा रुपयांची वाळू चोरली जात आहे.

विशेष म्हणजे ज्याच्या पोलीस दरबारी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आणि ज्याने लाखो रूपयांची वाळू चोरून शासनाला चुना लावणार्‍या माजी नगरसेवकानेही आपल्या चेल्या चपेल्यांसोबत गिरणा पात्रात वाळू चोरीसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रकोप वाढल्याने शासकीय यंत्रणा ढिली झाली आहे. त्याचा फायदा वाळू माफिया गिरणा नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी करून घेत आहे. गेल्या महिनाभरापासून तर सायगावपासून ते बहाळ टेकवाडेपर्यंत वाळू चोरीने कहर केला आहे.

रात्रंदिवस ओमनी, ट्रॅ्क्टर, बैलगाडी व इतर वाहनांद्वारे वाळू उत्खनन करून वाहतुक केली जात आहे. वाळू चोरांनी गिरणा गिरणेचे काही दिवसापासून अक्षरशा वस्त्रहरण चालवले आहे. रात्रंदिवस गिरणा पात्रातून ठिकठिकाणी मिळेल त्या वाहनांमधून इतकी वाळू चोरी होत आहे की, गिरणेत जागो जागी वाळू चोरीमुळे खड्डे पडले आहेत. शासनाचे गिरणा पात्रात कुठेही वाळूचे लिलाव नसतांना देखील ही वाळू चोरी कुणाच्या आशिवार्दाने होत आहे असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे.

परंतू पोलिसांतील काही कर्मचारी वाळू चोरीसाठी चौफेर पद्धतीने आर्थिक व्यवस्था करीत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसातील हा चौफेर आर्थिक व्यवस्था करणार्‍या कर्मचार्‍यांची बदली देखील झाली होती. परंतू तो पुन्हा लोकप्रतिनिधीच्या कृपाआर्शिवादाने मेहुणबारे येथे रुजू झाल्याची पोलीस कर्मचार्‍यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यांच्या आर्शिवादाने रहिपुरी, लांबे वडगाव भागात तर गिरणेतून वाळू उत्खनन करून या वाळूचे ढिगारे परिसरात टाकून तेथून तालुक्यात रात्री वाळू पुरवाठ होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गिरणा नदीपात्रात होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने तलाठ्यांचे गस्तीपथक नेमले होते. तालुक्यात सहा ते सात पथके कार्यरत होती. मात्र गेल्या काही दिवसापासून वाळू चोरी प्रकरणी कारवाई थंड झाली आहे. त्यामुळे वाळू चोरांविरूद्धची कारवाई का थंडावली असा प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्यातून स्पेशल पथकाची नेमणूक करण्याची वेळ आली आहे.

कर्मचार्‍यांकडून वाळू चोरट्यांना टिप्स : कोरोनाच्या प्रकोपामुळे महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बाहेर पडत नसल्याने गिरणा नदीला कोणीच वाली नसून त्याचा फायदा घेऊन गेल्याकाही दिवसात वाळू चोरीचा वेग जबरदस्त वाढल्याचे बोलले जाते. एका दिवसातच लाखो रूपयांची उलाढाल वाळू चोरीतून होत असल्याचे बोलले जाते. तसेच गावातील काही ग्रामस्थांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्‍यांना वाळू चोरीबाबत माहिती दिली, तर हे कर्मचारी थेट त्या ग्रामस्थांचे नाव वाळू चोरट्यांना सांगतात, आणि वाळू चोरटे त्यांना इतर पद्धतीने दमदाटी करत असल्याची गावात चर्चा आहे. त्यामुळे आता वाळू चोरीस खतपाणी घालणार्‍यांना या कर्मचार्‍यांवर बडतर्फेची कारवाई केली पाहिजे, तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड देखील चेक करण्याची आता वेळ आली आहे. नाहीतर येणार्‍या काळात मेहुणबारे परिसरातून वाहणारी गिरणामाईचे पाणी दिसेनासे होण्यास वेळ लागणार नाही.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com