साकेगाव जि.प. शाळेत संगणकाची चोरी

साकेगाव जि.प. शाळेत संगणकाची चोरी

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये zp school एका खोलीत ठेवलेले संगणकाचे Computer चार संच अज्ञात चोरट्यांनी unknown thieves वर्गाच्या मागच्या बाजूच्या खिडकूचे गज वाकवून आत प्रवेश करत चोरल्याची घटना नुकतीच घडली असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात taluka police station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकेकाळी विद्यार्थ्यांची रेलचेल व शिक्षणाचा उच्च दर्जा असणार्‍या मोठे अधिकारी घडविणार्‍या जिल्हा परिषद शाळेची सध्या वाताहात होवू लागली असून या आवारात नको ते प्राणी मुक्त संचार करतात तसेच रात्रीच्या काळोखात येथे दारूच्या बाटल्या फोडून ओल्या पार्ट्या होतात याशिवाय नको ते प्रकार घडतात, संपूर्ण शालेय परिसराची वाट लागली असून वर्गखोल्या बाहेर मोठमोठे गवत व घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

चोरीच्या घटना नेहमीच्याच- 24 वर्ग खोली असलेल्या या शाळेमध्ये चार महिला शिक्षका कार्यरत असून विद्यार्थी संख्या एकूण 89 इतकी आहे. या शाळेमध्ये आओ जाओ घर तुम्हारा अशी गत झाली असून सातत्याने येथे चोरीच्या घटना घडत असतात कधी वर्गखोल्यांच्या खिडक्यांचे लोखंडी ग्रिल गायब होतात तर कधी कुलूप तुटलेले असतात तर कधी कागदपत्राची अफरातफर केलेली असते, ही नित्याचीच बाब या शाळेत झालेली आहे.

नुकतेच या शाळेमध्ये बंद खोलीत भुरट्या चोरांनी मागच्या बाजूने येऊन खिडकीचे लोखंडी आसार्‍या वाकवून आत प्रवेश केला व खोलीत ठेवलेले चारही संगणक गायब केले.

या शाळेमध्ये चारही शिक्षक हे महिला असून टवाळखोर या ठिकाणी दिवसभर मुक्तसंचार करीत असतात एखाद वेळेस त्यांना काही म्हटलं तर चक्क वर्ग खोल्यांमध्ये दगडही भिरकवतात अशी आपबिती येथील शिक्षकांनी कथन केली, महिला असल्यामुळे जास्त बोलता येत नाही, शाळेतून गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी वेगळंच चित्र या परिसरामध्ये दिसून येते असे शिक्षकांकडून सांगण्यात आले.

जि. प. सदस्यांची भेट - जि. प. सदस्य रविंद्र पाटील यांनी शाळेची झालेली दुर्दशा व झालेल्या चोरीच्या घटनांबाबत शाळेत येऊन पाहणी केली तसेच शाळेची झालेली दयनीय अवस्थेचे लवकरच रुप बदलेल असे आश्वासन देत परिसराची साफसफाईसह मैदानी खेळ या आवारात कशा पद्धतीने घेता येईल याबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. तसेच या ठिकाणी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जे काही मदत व सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com