‘सह्याद्री ते हिमालय पर्वत’: भिवंडीच्या पर्यावरणप्रेमी युवकाचा असाही पायी प्रवास

माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार
‘सह्याद्री ते हिमालय पर्वत’: भिवंडीच्या पर्यावरणप्रेमी युवकाचा असाही  पायी प्रवास

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी Environmental promotion विविध प्रयत्न केले जातात. मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत झाडांची राजरोस कत्तल केली जाते. त्यातच जंगलांचा र्‍हास होत असल्याने पर्यावरण रक्षणाची जागतिक समस्या सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही कोणतीही शासकीय मदत न घेता, पर्यावरण रक्षणासाठी Environmental promotion भिवंडीतील Bhiwandi तरुणाने मोहीम हाती घेतली आहे. ‘सह्याद्री ते हिमालय पर्वत’ Sahyadri to Himalayan Mountains'असे सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहे. सिद्धार्थ गणाई Siddhartha Ganai असे या 24 वर्षीय पर्यावरणवादी ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे नुकतेच भुसावळात आगमन होऊन गेलेे. त्याचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले.

मागील 20 जुलैला त्याने रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सह्याद्री ते नेपाळमधील हिमालय पर्वतापर्यंत मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत चालत जातांना प्रकृती बिघडू नये म्हणून फक्त घरचे जेवण व पाणी मिळावे, असे आवाहन तो पायी जातांना करत आहे. प्रत्येक ठिकाणी थांबून एक एक झाड लावून ’एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ हा सामाजिक संदेश देत आहे. तो शहरात पोहचला असता, गांधी पुतळ्याजवळ त्याचे स्वागत करुन, पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी लोक संघर्ष मोर्चाचे चंद्रकांत चौधरी, संजीव पाटील, किरण मिस्तरी, हाजी जावेद शेख, नाना पाटील, सुरेंद्र पाटील, राजेंद्र जावळे, सुरेंद्रसिंग पाटील, संजीव पाटील, राजश्री नेवे, किरण मिस्तरी, सतिष कांबळे, चेतन गागाई आदी उपस्थित होते.

आर्थिक मदतीअभावी पायीच सुरु केला प्रवास - सिद्धार्थ अंधेरी येथील भवन महाविद्यालयात टी. वाय. बीएस. सी मध्ये शिक्षण घेत असून, भिवंडीतील बापगाव येथील मैत्रिकुल येथे तो आपल्या मित्रांसोबत राहतो. पाच वर्षांपूर्वी त्याने माउंट एव्हरेस्ट शिखर चढण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मात्र त्यासाठी येणार आर्थिक खर्च मोठा असल्याने सिद्धार्थने मोटरसायकल, सायकल, स्केटिंग अशा सर्व पर्यायांचा विचार व अभ्यास केला. मात्र त्यातही खर्च व अडचणी जास्त असल्याने सिद्धर्थने पायी प्रवास करून माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला आहे.

हलाखीच्या परिस्थितीत काढले दिवस - पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाईचे बालपण अत्यंत हलाखीत गेले आहे. सिद्धार्थ लहान असतांनाच आई वडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी पालन पोषणाची जबादारी वडिलांनी स्वीकारली. मात्र वडीलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणी एक ते दोनवर्ष सिद्धार्थने मुंबईतील अंधेरी येथील एका पुलाखाली आपले बालपण काढले. त्यांनतर पोलिसांच्या मदतीने सिद्धर्थच्या आईचा शोध घेण्यात आला. त्यावेळी त्याची आई केरळ येथे असल्याने सिद्धार्थचे प्राथमिक शिक्षण केरळ येथे झाले. मात्र 2011 पासून तो मुंबईत परतला. त्यांनतर मावशी व इतर नातेवाईकांनी त्याचा सांभाळ केला.

700 किमी अंतर केले पुर्ण - सध्या तो भिवंडीतील बापगाव येथील मैत्रीकुल येथे राहतो. विद्यार्थ्यांसाठी काम करणार्‍या विद्यार्थी भारती संघटनेचा सदस्य असून, येथूनच त्याला माउंट एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सिद्धार्थ गणाई याने सांगितले. त्याने आतापर्यंत 700 किमी अंतर पार केले आहे. आता कितीही संकट आले तरी मागे फिरायचे नाही, असा वसा घेत तो आपल्या ध्येयाकडे मार्गस्थ झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com