मुंबई - Mumbai - Jalgaon :

जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र तथा बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या आबाची गोष्टला साहित्य अकादमीचा मानाचा मानला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आबा महाजन हे महसूल खात्यात अधिकारी आहेत. त्याच सोबत लेखकही आहेत. प्रामुख्याने बालसाहित्यासाठी त्यांची ख्याती आहे. त्यांची 13 पुस्तके व 8 पोस्टरकविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना राज्य शासनाचे 3 पुरस्कार मिळाले आहेत

आबा महाजन यांचे बालकथा. बालकादंबरी, बालकविता, बालनाट्य व मुलांसाठी ललित लेखन असे बालसाहित्यातल्या सर्व प्रकारांचे लेखन प्रकाशित आहे.

मन्हा मामाना गावले जाऊ हा महाराष्ट्रातील पहिला अहिराणी बालकविता संग्रह त्यांच्या नावावर आहे. अहिराणी व मराठी असा द्वैभाषिक प्रयोग या पुस्तकात केला आहेत्यांचा मन्हा गावले हा दुसरा संपूर्ण अहिराणी बाल-कुमार कवितासंग्रह असून हा कवितासंग्रह नांदेड विद्यापीठात एम ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

त्यांच्या अनेक कथा/कविता इतर भाषांत अनुवादित झाल्या असून त्यांपैकी काहींचा पाठ्य पुस्तकांत, विद्यापीठ अभ्यासक्रमांत समावेश झाला आहे. देशभरात प्रतिष्ठेचे मानले जाणारे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

यंदा दोन मराठी लेखकांना हे पुरस्कार पटकावण्यात यश आले आहे. मराठीमध्ये नंदा खरे -कादंबरी उद्या आणि आबा महाजन- आबाची गोष्ट (बालसाहित्य) या दोन लेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.