अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत रुद्र घिर्णीकर देशात तिसरा

चेन्नईत निकाल जाहीर
अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत रुद्र घिर्णीकर देशात तिसरा

जळगाव - Jalgaon

एसआयपी अबॅकस (Abecus) संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शारदाश्रम विद्यालयाचा इयत्ता ४ थीचा विद्यार्थी रुद्र शिरीष घिर्णीकर याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. दि.१२ रोजी चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऍबेकसचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

लहानपणापासून अभ्यासाची आणि गणिताची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एसआयपी ऍबेकस या संस्थेव्दारे स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये २७ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १७ हजार तर राष्ट्रीय स्तरावर ४ हजार विद्यार्थी निवडले गेले.

देशभरातून निवडलेल्या चार हजार विद्यार्थ्यांमधून जळगावातील रुद्र शिरीष घिर्णीकर याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. रुद्रला गंगोत्री नॉलेज सेंटरचे शिक्षक आणि त्याची आई ऋतुजा घिर्णीकर यांचे मार्गदर्शन लाभले. रुद्रच्या या यशामुळे जळगावचे नाव लौकीक झाले आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com