गाळ्यांसह वॉटरग्रेस लवादक ठरावाबाबतची मागविली माहिती

अ‍ॅड. विजय पाटील यांनी माहिती अधिकारात मनपाला दिला अर्ज
गाळ्यांसह वॉटरग्रेस लवादक ठरावाबाबतची मागविली माहिती
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महापालिकेची दि. 12 मे रोजी ऑनलाइन महासभा झाली. या सभेत मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत आणि वॉटरग्रेस लवादक नियुक्तीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही ठरावाबाबत झालेल्या कामकाजाविषयीची माहिती अ‍ॅड. विजय पाटील यांनी महानगरपालिकेला माहिती अधिकारात अर्ज देवून मागविली आहे.

मनपाच्या झालेल्या ऑनलाइन सभेत मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतच्या आणि मनपा व वॉटरग्रेस कंपनी यांच्यातील असलेल्या वाद-विवादाचा तोडगा काढण्यासाठी लवादक नियुक्तीच्या ठरावावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपावरुन महासभेत गदारोळ झाला होता.

गाळ्यांच्या विषयाला भाजपने तटस्थची भूमिका घेतली. तर वॉटरग्रेस लवादक नियुक्तीच्या ठरावाला भाजपने विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर शिवसेनेने हे दोन्ही ठराव बहुमताने मंजूर केले आहे. महासभेपुर्वी अ‍ॅड. विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून वॉटरग्रेसच्या लवादक नियुक्तीचा ठराव बेकायदेशिर असल्याची भूमिका मांडली होती. तसेच वॉटरग्रेसचा ठराव झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

गुन्हा दाखलच्या भूमिकेकडे लक्ष

महासभेत हे दोन्ही ठराव बहुमताने मंजूर झाल्यामुळे ऑनलाइन झालेल्या महासभेचे संपुर्ण रेकॉर्डींग, ठरावाबाबत झालेले सर्व नगरसेवकांचे मतदान, विषय पत्रिका, डॉकेट आणि आयुक्तांचे अभिप्राय याबाबतची माहिती अ‍ॅड. पाटील यांनी माहिती अधिकारांअंतर्गत महापालिकेकडून माहिती मागविली आहे. त्यामुळे आता, महापालिकेकडून माहिती मिळाल्यानंतर अ‍ॅड. विजय पाटील हे गुन्हा दाखल करतील काय? किंवा काय भूमिका घेतात? याकडे आता लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com