आरोग्य सभापतींच्या दालनात कोसळले छत

जिल्हा परिषदेतील घटना; स्वीय साहाय्यक बालंबाल बचावले
आरोग्य सभापतींच्या दालनात कोसळले छत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांच्या स्वीय सहाय्यक दालनातील छत सोमवारी सकाळी 11 वाजता कोसळल्याची घटना घडली.यात स्वीय साहाय्यक कांतीलाल पाटील हे थोडक्यात बालंबाल बचावले आहे.

जिल्हा परिषदेतील जुनी इमारत ही पूर्ण पणे जीर्ण झालेली आहे. या इमारतीत शिक्षण विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग असे विविध विभाग आहेत. अनेक कर्मचारी या इमारतीत जीव धोक्यात घालून काम करीत असतात.

यातच जिल्हा परिषदेतील शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या स्वीय सहाय्यक दालनातील छत आज सोमवारी सकाळी 11 वाजता कोसळले.

या घटनेत त्यांचे स्वीय सहाय्यक कांतीलाल पाटील हे थोडक्यात बचावला अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. स्विय सहाय्यक यांच्या दालनाचे दुरुस्तीचे पत्र बांधकाम विभागाला ऑक्टोबर महिन्यापासून देण्यात आलेले आहे.

मात्र, बांधकाम विभाग या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. अजून या विभागाची दुरुस्ती न केल्यास असे छंत एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कोसळले तर मोठा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देवून दुरुस्तीची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com