अडावद विज उपकेंद्रातील रोहित्र जळाले
जळगाव

अडावद विज उपकेंद्रातील रोहित्र जळाले

रोहित्रासह इतर साहित्याचे मोठे नुकसान

Rajendra Patil

अडावद ता.चोपडा - वार्ताहर Chopada Adavad

येथीलल विजवितरणच्या उपकेंद्रात १२.४५ च्या सुमारास एका ५ mva च्या रोहित्राला अचानक आग लागली त्यात रोहित्राचे तसेच त्याच्यावर जोडणी केलेल्या साहित्याचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रथम दर्शी कळते.

येथे आज ११.३० वाजेपासून जोरदार पावसाचे आगमन झाले त्यात नेहमी प्रमाणे लाईट गेली १२.४० च्या जवळपास पाऊस कमी झाला त्यावेळी लाईट आली. लाईट यायला पाच-सहा मिनीट झाले असतील तेव्हा अडावदच्या पूर्वेस विजवितरण कंपनीचे ३३/११ उपकेंद्रात ५ एम.व्ही.एचे ४ रोहित्रांपैकि शेवरा व उनपदेवचे फिडर असलेल्या रोहित्राला अचानक आग लागली.

आग इतकी भयंकर होती कि दूरून धूराचा डोंगर दिसत होता. गावातील नागरीकांनी उपकेंद्राकडे धाव घेतली. सर्व कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोवर प्रभारी वर्डीचे सहा.अभियंता पंकज बाविस्कर हजर झाले चोपडा नगर पालीकेची अग्निशामक बंब आल्यावर आग विझवण्यात आली.

रोहित्र जळल्याची माहिती मिळताच चोपडा येथील सहा.कार्यकारी आभियंता सावकारे उपस्थित झाले. कसलाही दाब नसलेल्या रोहित्राला आग कशी लागली याचे कारण अजून समजू शकले नाही.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com