सर आली धावून, रस्ता गेला वाहून

सर आली धावून, रस्ता गेला वाहून

जळगाव शहरातील प्रकार

जळगाव - Jalgaon

गेल्या दोन दिवसापुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि नाला तुंबल्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील स्वामी नगरातील कच्चा रस्ताच वाहून गेला. त्यामुळे दोन दिवसांपासून हा रस्ता बंद होता. दरम्यान, नगरसेवक प्रवीण कोल्हे (Corporator Praveen Kolhe)यांनी परिसराची पाहणी करुन जेसीबीच्या सहाय्याने नालेसफाई करण्यात आली.

मनपा प्रशासनातर्फे (Municipal administration) मान्सुनपुर्व नालेसफाई केली होती. प्रशासनाने तसा नालेसफाई पुर्ण झाल्याचा दावा देखील केला आहे. मात्र, दोन दिवसांपुर्वीच झालेल्या पावसामुळे स्वामी नगरातील नाला तुंबला होता. जोरदार झालेल्या पावसामुळे आणि नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे स्वामी नगरातील कच्चा रस्ता वाहून गेला.

दोन दिवसांपासून रस्ता बंद
खेडी परिसर प्रभाग क्र. ३ मधील स्वामी नगरातील रस्ता, वाहून गेल्यामुळे दोन दिवसांपासून बंद होता. नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरसेवक प्रवीण कोल्हे यांनी परिसरात जावून पाहणी केली. त्यानंतर महापालिकेचे जेसीबी आणि ट्रॅक्टर बोलावून साफसफाई केली आणि नागरिकांना येण्याजाण्यासाठी पुन्हा रस्ता तयार करुन दिल्याची माहिती नगरसेवक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

अंदाजपत्रक करणार सादर
स्वामी नगरात पुलाच्या बांधकामासाठी महापौर आणि उपमहापौर यांना माहिती दिली असून, त्यांनी तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार लवकरच अंदाजपत्रक सादर करणार असल्याचे नगरसेवक कोल्हे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com