चाळीसगाव पालिकेच्या आधिकार्‍यांकडून खासदारांच्या आदेशाला केराची टोपली?

रस्त्यांसह मुलभूत सुविधांपासून नागरिक वंचित, पालिकेची सत्ता नेमकी कोणाचा हाती?
चाळीसगाव पालिकेच्या आधिकार्‍यांकडून खासदारांच्या आदेशाला केराची टोपली?

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपूर्वीच खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) शहरातील विकासकामाचा वेग मंदावला म्हणून चाळीसगाव पालिकेच्या (Chalisgaon Municipality) सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी (MP Unmesh Patil) खासदार उन्मेश पाटील यांनी पालिकेच्या आपल्या कामात सुधारणा करा, जनतेच्या समस्या मार्गी लावा. नियोजित विकासकामांना गती द्या.अन्यथा माझ्याशी गाठ आहे. अशी तंबी पालिकेच्या आधिकार्‍यांना दिली होती.

परंतू ही बैठक घेवून दिड महिना झाला, तरी देखील शहरातील विकास कामांचा विशेषता; रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागेला नाही, त्यामुळे शहरवासियांचे प्रचंड हाल होत आहे. यावरुन खासदारांच्या सूचना देखील पालिका प्रशासन व भाजपाचे नगरसेवक जुमानत नसल्याचे सिद्ध होत असून खासदारांच्या आदेशला केराची टोपली तर दाखवली नाही ना? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर खा.उन्मेष पाटील यांनी दिलेली तंबी फक्त दिखाव्या पूर्तीच होती का ? अशी चर्चा होत असून नेमकी चाळीसगाव नगरपरिषदेची सत्ता कोणाचा हातात आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जावू लागल आहे.

खासदार उन्मेश (MP Unmesh Patil) पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेल्या दिड महिन्यापूर्वीच चाळीसगाव पालिकेच्या आधिकार्‍यांची विभागनिहाय आढावा बैठक खासदार उन्मेष पाटील यांनी घेतली होती. या बैठकीस पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, माजी.मुख्याधिकारी नितीन कापडणीस, पालिकेतील गटनेते संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक नितीन पाटील, मुख्य अभियंता विजय पाटील, उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे, सभा लिपिक विजय खरात, पाणीपुरवठा अभियंता राजीव वाघ, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी, संजय गोयर,सचिन निकम,वीज अभियंता कुणाल महाले, योगेश मांडोळे, लेखापाल कुणाल कोष्टी, नगर अभियंता नितीन देवरे,संगणक अभियंता महेश शिंदे,कर निरीक्षक राहुल साळुंके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत खासदार उन्मेश पाटील यांनी पालिकेच्या प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला होता, व विविध विभागांच्या अधिकार्‍यांना पालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नसल्याचे कारण सांगून विभागांमध्ये मरगळ आली असून आपापल्या विभागातील कामाबाबत नागरिकांच्या शहरातील धूळयुक्त रस्ते, पथदिवे, पाणी, स्वच्छता आदी तक्रारींचा त्वरित निपटारा करा. असे आदेश वजा सूचना दिल्या होत्या. परंतू त्यापैकी आजघडीला एकही समस्या मार्गी लागलेली दिसत नाही.

शहरात आज अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. शहरातील रस्त्यांची पूर्णता; चाळण झालेली आहे. परंतू सत्ताधारी व विरोधक तातडीने उपाय-योजना करण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल उंचलत नाही. आम्ही रस्त्यांचा विषय मंजुरीसाठी पाठवला असल्याचे, फक्त त्यांच्या तोंडून ऐकला मिळत आहे. परंतू अद्यापर्यंत प्रत्यक्षात कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही. भरपावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. रस्त्यावरुन जाता लोक चिखलाने माखल्याशिवाय राहता नाहीत. आता पावसाळा गेल्यावर रस्ते तयार होणार असेल, त्याचा काय उपयोग होईल, परंतू काही महिन्यात न.पा.च्या निवडणुका आहेत. त्यामुळेच निवडणुकांच्या तोडावर रस्ते व इतर विकास कामे दाखविले जाणार आहेत. हे मात्र नक्की म्हणता येईल.

या सूचनांवर अमंलबजावणी नाहीच

अकरा नंबर शाळेतील इनडोअर स्टेडियम, खरजई नाका चौक, राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या कार्यालय वसतीगृह चौक, पोलीस स्टेशन समोरील सावरकर चौक, छत्रपति शिवाजी महाराज पुतळा बांधकाम कामाची पाहणी करुन, या चौकाचे विस्तारीकरण, छञपती शिवाजी महाराज पुतळा हा चौक देखणा व्हावा, यासाठी वाहतूकीस अडचण ठरणारा स्टेशन रोड कडील कारंजा बांधकाम काढून टाकण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी दिल्या होत्या. परंतू या सूचनांची आद्यपर्यंत कुठल्याही पद्धतीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ही बैठक फक्त दिखाव्या पूर्ती होती का? असा देखील प्रश्‍न उपस्थित होत असून अनेक चर्चांना उत आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com