पत्रे ठोकून फुले मार्केट चहुबाजूने बंद

पत्रे ठोकून फुले मार्केट चहुबाजूने बंद

निर्बंधात व्यवसाय करणार्‍यांना चाप; दहा दुकाने सील

जळगाव - Jalgaon

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. निर्बंध असतांनाही काही व्यावसायिक शटर पाडून आतमध्ये व्यवसाय करीत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे आता, पत्रे ठोकून फुले मार्केट चहुबाजूने बंद करण्यात आले आहे. दरम्यान, आज उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दहा दुकानांवर सीलची कारवाई केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमध्ये काही व्यावसायिक शटर पाडून सर्रासपणे व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता, फुले मार्केटमधील दोन प्रवेशव्दार वगळता अन्य प्रवेशव्दारांवर पत्रे ठोकून प्रवेश बंद करण्यात आला आहे.

प्रवेश बंद केल्यामुळे आता, व्यावसायिकांना चाप बसणार आहे. शटर पाडून व्यवसाय कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अत्यावश्यक सेवा वगळता जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी ७ ते ११ ची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. उर्वरीत व्यवसायाला बंदचे आदेश आहेत. तरीदेखील शटर बंद करुन लपुन-छपून व्यवसाय करतांना दिसून येत आहे. निर्धारीत वेळेपेक्षा व्यवसाय करणार्‍यांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागातर्फे गेल्या दिवसांपासून कारवाईची मोहीम सुरु केली आहे. शनिवारी सकाळपासून उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापुरे, किशोर सोनवणे, सलमान भीस्ती, सुनील पवार यांच्यासह पथकाने भवानीपेठ, बळीरामपेठ, फुले मार्केट, केळकर मार्केट परिसरात पाहणी केली. यावेळी शटर पाडून व्यवसाय करणार्‍या दहा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, दुकाने सील करण्यात आली आहे.

या दुकानांवर सीलची कारवाई शटर पाडून व्यवसाय करणार्‍या दहा दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. यात भवानी पेठेतील के.एच.ट्रेडर्स, बळीरामपेठेतील राहुल गार्मेन्टस्, राजप्रकाश, पियुष प्लाझातील जय मातादी रेडिमेड, सेंट्रल फुले मार्केटमधील एसएसडी कलेक्शन, हरिओम मार्केटमधील एस.एम.टेलर्स, कोंबडी बाजार चौकातील त्रिमुर्ती ऑफसेट, जय हार्डवेअर हाऊस, तर केळकर मार्केटमधील चांदणी एजन्सीज, नंदीनी एजन्सीज या दुकानांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com