जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र

अभिषेक पाटील यांच्यासह 12 आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र

जळगाव : Jalgaon

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यापाठोपाठ विविध 12 आघाड्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी शुक्रवारी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

अभिषेक पाटील (Abhishek Patil) यांनी महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे काही पदाधिकारी नाराज झाले आहेत. दरम्यान, युवकच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर संताप व्यक्त केला.

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही स्थानिक मंडळींनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. तसेच चुकीच्या पद्धतीने नेत्यांकडे मांडणी केल्याचा आरोप स्वप्निल नेमाडे यांनी केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे.यात महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना पाटील, स्वप्निल नेमाडे, कुणाल पवार, अनिल पाटील, तुषार इंगळे, अक्षय वंजारी, आरोही नेवे, जितेंद्र चांगरे, रमेश भोळे, गौरव लवंगडे, कौशल काकर, हेमंत स्वराज यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com