<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>चाळीसगाव नगरपरिषदने शहरातील अतिक्रमण विरोधात कारवाई तेज केली आहे. पालिकेच्या पथकाने बुधवारी कुरैशी नगरातील ५० घरांचे अतिक्रमण काढल्यानंर गुरुवारी पुन्हा पाटणादेवी येथील अतिक्रमण विरोधात मोहिम राबवित, वाहतुकीस अडथळा ठरणारी ३० घरे व अन्य काही दुकानांचे अतिक्रमण हटवले.</p>.<p>अतिक्रमण दूर झाल्याने हा रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे. तर वाहतुकीचा अडथळा दूर झाल्याने या रस्त्याचा कायापालटही होणार आहे. हि कारवाई मुख्याधिकारी शंकरराव गोरे, नगराध्यक्षा आशलता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगर रचनाकार विभागाचे अभियंता विजय पाटील, नितीन देवरे, अतिक्रमण विभागचे लिपीक प्रेमसिंग राजपूत, लिपीक भुषण लाटे, संजय राजपूत, नंदलाला जाधव, आरोग्य विभागाचे तुषार नकवाल, कर्मचारी तुषार माने, मेहुमुद बेग, वकार शेख, सलीम शेख, सुनिल चौधरी, निलेश चौधरी आदिच्या पथकाने केली. नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मूलनाच्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असून शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढण्याची देखील मागणी होत आहे.</p>