जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गत वर्षातच नव्हेतर गेल्या काही वर्षापासून महावितरणच्या वीज ग्राहकांची वीजबिल थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

त्यामुळे महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण आहे. त्यामुळे महावितरण अधिकारी कर्मचार्यांनी थकीत वीज वसुलीसाठी अधिक कार्यक्षमतेने कामकाज करून 100 टक्के वसुली करावी.

या कामात अकार्यक्षम कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी दिले.

जळगाव परिमंडळ कार्यालयात महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव परिमंडळांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडळातील अधिकार्यांची वीजबिलांची थकबाकी व वसुलीचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

सर्वसाामान्य वीज ग्राहकांशी सौजन्य, समाधानकारक सेवेसह वीजगळती, वीजबिलांची थकबाकी नियंत्रण आणणे गरजेचे आहे.अन्यथा त्याचा परिणाम दैनदिन सेवांवर होऊ शकतो.

थकीत व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची वीजबिले वसुली अथवा वीजपुरवठा खंडित करा. महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती शेतकर्यांपर्यंत पोचवून जास्तीत जास्त शेतकर्यांना या सवलतीची माहिती देऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही बोडके यांनी दिले.

यावेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर, प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार आदि कार्यकारी अभियंते, अधिकारी उपस्थित होते.