चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरी उघड्या असतात. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत. चाळीसगाव तालुक्यातील देवळीत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तालुक्यातील देवळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आडगाव शिवारात पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेले विहिरीत कुजलेल्या अवस्थेतील एकाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,दि, २ पासून तालुक्यातील उंबरखेड येथील तुकाराम धर्मा महाले(४६) हे बेपत्ता झाले होते. त्याचा मृतदेह आज (दि.८) आडगाव शिवारातील देवळी गावाच्या (वॉटर सप्लाय) पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये आढळून आला. सदरील व्यक्तीचा मृतदेह कुझलेला अवस्थेत मिळाला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला नोंद आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे. प्राप्त माहितीनुसार मयत हे वेडसर असल्याचे समजते.

दरम्यान गेल्या ८ दिवसापासून ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत खुललेला अवस्थेत मुद्दे असताना, देवळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक हे काय करीत होत असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दहा दिवसापासून तेच पाणी ग्रामस्थांना पिण्यास आणि सोडण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पाण्यामुळे दूषित वातावरण निर्माण झाले असून गावातील नागरिक आजारी पडत असल्याचे बोलले जात आहे.