गणेशोत्सवा निमित्त महिला कामगारांचा सत्कार

श्रीश्री लेक प्राईड सोसायटीचा पुढाकार
गणेशोत्सवा निमित्त महिला कामगारांचा सत्कार

जळगाव । Jalgaon

शहरातील मेहरुण तलावाजवळील श्री श्री लेक प्राइड सोसायटीतील सिद्धी गणेश मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त सोसायटीत येणार्‍या 50 कामगार महिलांना साडी-चोळी, छत्री व किराणा सामान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सोसायटीच्या सदस्यांनी मिळून सामाजिक उपक्रम करण्याचा निर्णय घेतला. सकाळी गणपतीची आरती, अभिषेक करण्यात आले. त्यानंतर सोसायटीत कामाला येणार्‍या महिलांचा सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com