जिल्ह्यासाठी 17 हजार 50 कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त

जिल्ह्यासाठी 17 हजार 50 कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त

ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला येणार वेग; जिल्हानिहाय झाले वितरण

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या लसीचे 17 हजार 50 डोस प्राप्त झाले आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांच्याशी चर्चा करुन तालुकानिहाय लसीचे वितरण करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेने लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

प्राप्त झालेल्या लसीच्या साठ्यातून एम.डी.अमळनेर 250, आर.एच.अमळनेर 100, अमळगाव 100, भडगाव 150, भुसावळ हॉस्पिटल 600, यूपीएससी खडका रोड, भुसावळ 200, वरणगाव 200, बोदवड 100, चाळीसगाव 200, मेहुणबारे 100, चोपडा 250, धरणगाव 200, एरंडोल 200, जीएमसी 750, जळगाव सिव्हील 600, जामनेर 200, पहूर 100, मुक्ताईनगर 200, पाचोरा 250, पिंपळगाव 100, आर.एच.पारोळा 150, रावेर 100, पाल 100, सावदा 100, यावल 200, न्हावी 100, पीएचसी 11,450 असे एकूण 17 हजार 50 लसीचे डोस वितरण करण्यात आले आहे. अशी माहिती जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com