जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

वाचन संस्कारामुळे मुलामुलींसह महिलांवर उत्त्तम संस्कार जडतात. वाचनामुळे महिलांना बुद्धी, वाचा आणि जगण्याची नवी उर्मी मिळते, असे प्रतिपादन साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता कोल्हे-माळी यांनी केले.

जनमत प्रतिष्ठान, मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीनगर येथे स्वर्गीय किसन पुना नाले यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक मोफत वृत्तपत्र वाचनालय 26 डिसेंबर रोजी सुरू केले, त्यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. वाचनालयातून वाचन परंपरा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्न नालेंनी केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. दर्जेदार पुस्तके महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन एका वृत्तपत्रासाठी देणगी देण्याची घोषणा केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर होते. प्रमुख अतिथी कमल केशव प्रतिष्ठानच्या भारती म्हस्के, नगरसेविका नीता सोनवणे, होमगार्ड अधीक्षक अशोक साळी, रिद्धीसिद्धीसंस्थेच्या चित्रा मालपाणी उपस्थित होते. साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता ललित कोल्हे यांनी फित कापून उद्घाटन केले. अध्यक्षीय भाषणात शशिकांत हिंगोणेकर म्हणाले की,विधायक बातम्यांच्या माध्यमातून वृत्तपत्रांनी पुरोगामी समाजाची निर्मिती केली.

सामाजिक परिवर्तनासाठी विघातक बाबी पालकांनी मुलांच्या लक्षात आणून देऊन त्यावर सकारात्मक चर्चा मुलांशी केली पाहिजे असे भावनिक आवाहनही हिंगोणेकर यांनी केले. वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयातून चैतन्यशील ज्ञानसमृद्धीचे वातावरण निर्माण केल्याबाबत पंकज नालेंबद्दल आणि उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांनी देशदूत वृत्तपत्र वर्षभर उपलब्ध करुन दिल्याबद्दल हिगोणेकरांनी प्रशंसोद्गार काढले. स्वत:ही एका दैनिकासाठी वार्षिक देणगीचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, आरोग्यदूत पप्पू जगताप, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, अखिल भारतीय शाहू ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष हर्षाली पाटील, सह. फौजदार विश्वास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष साहिल पटेल, दिशा स्पर्धा परीक्षेचे संचालक वासुदेव पाटील, कै.कविवर्य नीळकंठ महाजन प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष विजय लुल्हे, सुबोध क्लासेसचे .सी.आर.पाटील,पोलीस सेवा संघटना जिल्हाध्यक्ष अतुल बोंडे, कलाशिक्षक सुनील दाभाडे, हेमंत सपकाळे, अनंत नेवे, वेदांत नाले, सचिन सैंदाणे, जयेश चौधरी, प्रशांत सुर्वे उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय लुल्हे यांनी केले.