<p><strong>रावेर|प्रतिनिधी Raver</strong></p><p>रावेरला कोरोना प्रतिबंधासाठी लस केव्हा येणार याची प्रतीक्षा लागलेली असतांना आता प्रतीक्षा संपली आहे.आज रावेर ग्रामीण रुग्णालयास दीड हजार लस प्राप्त झाल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ.एन.डी.महाजन यांनी दिली.</p>.<p>शहरात कोरोना रुग्ण संखेत घट झाल्याने,आरोग्य यंत्रणेपुढील ताण हलका झाला आहे.अद्याप कोरोनाचा धोका टळला नसल्याने,उपाय योजना आणि धोका टाळण्यासाठी सावधानी ठेवावी अशा सूचना प्रशासन देत आहे.यात आणखी म्हणजे तालुक्याला तब्बल दीड हजार लस शनिवारी सायंकाळी प्राप्त झाल्याने,पहिल्या टप्प्यात शासकीय डॉक्टर्स,खाजगी डॉक्टर्स,त्यांचे सहकारी,शिक्षक,पोलीस,शासकीय कर्मचारी यांना लस दिल्यानंतर सामान्य जनतेला लस दिली जाणार आहे.सोमवार पासून रावेर ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरवात होत आहे.यासाठी ग्रामीण रुग्णालयात रजिस्ट्रेशन कक्ष,लसीकरण कक्ष,व आराम कक्ष उभारणीसाठी तयारी होत असल्याची माहिती डॉ.एन डी महाजन यांनी देशदूत शी बोलताना दिली.</p>