जळगाव

रावेर : तीन मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो

सुकीसाठी अजून प्रतीक्षा

Rajendra Patil

रावेर - प्रतिनिधी - Raver

रावेर तालुक्यातील चार धरणांपैकी तीन धरणे भरली असून उर्वरित धरणे भरण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मंगरूळ आणि गंगापुरी, अभोडा भरली आहे. सुकी ७८ टक्के भरले गेल्याने यासाठी आणखी काही काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

सातपुड्यात अतिशय मनमोहक वातावरण झाले आहे.सगळीकडे हिरवा शालू पांघरलेले डोंगर,खळखळ वाहणारी नदी-नाले यामुळे निसर्गरम्य आणि मन प्रसन्न करणारे वातावरण आनंद लुटण्यासाठी खुणावत असले, तरी यंदा कोरोनामुळे या निसर्गाने विलोभनीय वातावरणचा मजा आपल्याला लुटता येणार नाही.

पावसाळ्यात धरणे भरली कि नाही याची मोठी उत्सुकता असतांना आनंदची बातमी आहे कि, मंगरूळ, अभोडा, गंगापुरी हे तिघे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगरूळ १०० टक्के भरून ३ से.मी. ओव्हरफ्लो होत आहे. सुकी नदीवरील धरण ७७.५१ टक्के भरले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com