बेबाबाई कुंभार यांना मुद्देमाल परत करताना पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे
बेबाबाई कुंभार यांना मुद्देमाल परत करताना पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे
जळगाव

रावेर : चोरीला गेलेले दागिने फिर्यादीला सुपूर्द

Ramsing Pardeshi

रावेर|प्रतिनिधी-

येथील कुंभारवाड्यात झालेल्या घरफोडीतील चोरीला गेलेला ऐवज न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीला सुपूर्द करण्यात आला आहे.चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने फिर्यादीला समाधान लाभले आहे.

येथील कुंभारवाड्यात झालेल्या घरफोडीतील २० हजार किमतीची १० ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेली पोत, १२ हजार ५०० रुपये किंमतीची ५ ग्रॅम मणी डोरलेची पोत, १४०० रुपये रोख ,२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ८ मणी असा एकूण ३५ हजार ९०० रुपये मुद्देमाल आरोपी रवींद्र नारायण कुंभार यांचेकडून जप्त करून न्या. आर. एल. राठोड यांचे आदेशाने मुद्देमाल फिर्यादी बेबाबाई प्रकाश कुंभार (रा.कुंभारवाडा रावेर) यांचे ताब्यात दिले आहे, नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली हे. कॉ.सतीश सानप यांनी केला असून नमूद मुद्देमाल फिर्यादिस पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी परत दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com