<p><strong>रावेर|प्रतिनिधी Raver</strong></p><p>येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सर्व्हर डाऊन झाल्याने सर्व व्यवहार बंद पडले आहे.येथील शाखेत असले प्रकार नित्याचे झाल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.</p>.<p> कोरोना काळात विविध उपाय योजना आखतांना गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न होणे खूप गरजेचे असतांना,रावेर शाखेत मात्र याबाबत गांभीर्य दिसत नसल्याने,कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या ठिकाणी तालुकभरातील ग्राहकांची वर्दळ असते.त्यामुळे प्रभावी उपाय गरजेचे असतांना,बँक प्रशासनाने काळजी घ्यावी अशी अपेक्षा ग्राहकांना आहे.</p>