रावेरमध्ये शिवसेनेला खिंडार अविनाश पाटील कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्तीत दाखल

उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने अकोला येथे झाला प्रवेश
रावेरमध्ये शिवसेनेला खिंडार अविनाश पाटील कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्तीत दाखल

रावेर|प्रतिनिधी- Raver

शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी मंगळवारी अकोला येथे प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. मुक्ताईनगर आ.चंद्रकांत पाटील यांचे समर्थक समजले जाणारे युवासेनेचे विभागीय युवा प्रमुख अविनाश पाटील यांनी समर्थकांसह प्रवेश केल्याने शिवसेनेला झटका बसला आहे.

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने जळगांव युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटीलसह युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यात तामसवाडी सरपंच नरेंद्र कोळी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शिवसेना शेख लतीफ, युवासेना शहरप्रमुख रावेर मनोज वरणकर, शिवसेना शाखाप्रमुख निंभोरासिम प्रवीण चौधरी, उपशाखाप्रमुख शिवसेना गौरव पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक शाखाप्रमुख विशाल पाटील, भूषण धनके, राजेंद्र पाटील, लीलाधर राजपूत, जीवन जाधव, जय राजपूत, भगवान कोळी निंबोल व इतर कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com