रावेरात गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

रावेर पोलिसांचे सोमवारी पहाटे तीन वाजता कोंम्बिग ऑपरेशन
रावेरात गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

रावेर प्रतिनिधी Raver

विनापरवाना गावठी (pistol) पिस्तुल बाळगल्या- प्रकरणी शहरातील दोघांना स्थानिक पोलिसांनी (Police) सोमवारी पहाटे अटक करून गुन्हा नोंद केला आहे.या घटनेने रावेरात एकच खळबळ उडाली आहे.

येथील कुंभार वाड्यातील रहिवासी महेंद्र अर्जुन प्रजापती वय-२५ याच्या घरातून २० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे मिळून आली आहे.ही कारवाई सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.यातील दुसरा आरोपी रवींद्र राजाराम प्रजापती याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. कॉन्स्टेबल सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून आर्म अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास इस्माईल शेख करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com