<p><strong>रावेर|प्रतिनिधी Raver</strong></p><p>येथे झालेल्या खून खटल्यातील आरोपींना शुक्रवारी रावेर न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.</p> .<p>बीड जिल्ह्यातील गेवराई येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या चिंतेश्वर गल्लीतील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय सौरभ गणेश राउत याचा रावेरात बुधवारी सकाळी खून झाल्याचे उजेडात आले होते. मयताच्या अंगावर असलेल्या शर्टाच्या कॉलरवर असलेले स्टीकर न्यू रिलायंस टेलर पैठण रोड, औरंगाबाद यावरून पोलिसांनी मयताची ओळख पटवण्यात यश आले होते. तर यात महेश विश्वनाथ महाजन,योगेश उर्फ भैया धोबी, विकास गोपाळ महाजन, विनोद विठ्ठल सातव यांनी कबुली जबाब दिल्याने, खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला होता.शुक्रवारी चौघे आरोपीताना रावेर न्यायालयात न्या.आर एल राठोड यांच्या समोर हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.</p>