रावेर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग
जळगाव

रावेर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

केंद्रसरकारचा अध्यादेश नुकसानदायी

Rajendra Patil

रावेर | प्रतिनिधी Raver

महाराष्ट्र बाजार समिती कर्मचारी संघ पुणे यांच्यावतीने पुकारलेल्या राज्यव्यापी एक दिवशीय लक्षणीक संपात बाजार समितीचे २२ कर्मचारी सहभागी झाल्याने आज रावेर बाजार समितीत...

दैनंदिन सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. केंद्र सरकार कडून काढण्यात आलेल्या आध्यादेशामुळे बाजार समितीचे कंबरडे मोडले जाणार आहे, याशिवाय बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करण्या बाबत देखील शासनाने विचार करावा या मागण्यांसाठी राज्यव्यापी संपात रावेर बाजार समितीचे सचिव, उपसचिव यांच्यासह २०कर्मचारी सहभागी झाले आहे.यामुळे बाजार समितीतील सर्व धान्य खरेदी विक्री ठप्प होऊन तब्बल 2 कोटींचा फटका यामुळे बसणार आहे. या संपाला हमाल मापाडी संघातर्फे देखील पाठिंबा मिळाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com