रावेरात रॉकेलचा भला मोठा अवैध साठा सापडला

पोलिसांनी रात्री उशिरा केली धडक कारवाई दोन जणांवर गुन्हा दाखल
रावेरात रॉकेलचा भला मोठा अवैध साठा सापडला

रावेर - Raver - प्रतिनिधी :

येथे बायोडिझेलमध्ये रॉकेल मिश्रित करून बायो डिझेलच्या नावावर विक्री करणारे दोन जण सापडले असून, त्यांच्याकडे तब्बल अडीच हजार लिटर अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.याबाबत रावेर पोलीस ठाण्यात दोन भावांवर गुन्हा दाखल झाला आहे.

येथील बऱ्हाणपूर रोडवर गोपी ट्रान्सपोर्टजवळ रॉकेल मिश्रित बायोडिझेल विक्री करत असलेल्या एकाला पोलिसांनी पकडले असता,त्यांच्या चौकशी दरम्यान मोठ्या प्रमाणात रॉकेल साठा कबरस्थान रस्त्यावर पालिकेच्या अतिक्रमित जागेत लपवून ठेवला असल्याची माहिती मिळल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून तपासणी केली असता,

तब्बल २५०० लिटर रॉकेल मिश्रित बायोझिडेल जप्त केले आहे.या प्रकरणी शेख शरीफ शेख मुस्लिम,शेख फिरोज शेख मुस्लिम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.दरम्यान रावेर दंगलीच्या वेळी कोंबिंग ऑपरेशन वेळी देखील मोठा साठा याच आरोपिकडे मिळून आला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com