वीज तार चोरी प्रकरणी भंगार मालक पोलिसांच्या ताब्यात

चोर आणि खरेदी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल
वीज तार चोरी प्रकरणी भंगार मालक पोलिसांच्या ताब्यात

रावेर - Raver - प्रतिनिधी : वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातुन ५ हजार किंमतीची ४५ किलो वजनाची विजेची तार चोरून नेणाऱ्या चोरट्यासह भंगार खरेदी करणाऱ्या दोघींवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करून भंगार मालकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यातील भंगार घेणारा शेख आरीफ शेख मोहम्मद यास अटक करण्यात आली आहे.तर चोरून नेणारा अजून मिळून आलेला नाही आहे.याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com