रावेर - Raver - प्रतिनिधी :

येथील नगरपालिकेच्या बंदवस्थेतील रुग्णालयाच्या मागील बाजूला एक नवजात बाळ आढळून आल्याने रावेर पोलिसांत अज्ञात आईविरुद्ध खाजगी चालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील बंद अवस्थेतील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात टूर्ससाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्या लावल्या जातात.बुधवारी दुपारी पावणे पाच वाजता काटेरी झुडपातून लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून या परिसरात उपस्थित असलेले गाड्यावरील चालक गोकुळ करवले,श्रीकांत चौधरी,विक्रम चौधरी,विजू महाजन,फिरोज तडवी,संजय नाथ यांनी काटेरी झुडपात पाहणी केली असता,त्यांना एका दिवसाचे पुरुष जातीचे बाळ आढळून आले.

त्यांनी रावेर पोलिसांत माहिती दिल्यावरून गोकुळ करवले यांच्या फिर्यादीवरून बाळाच्या अज्ञात आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील बाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून जळगाव येथील बाल दक्षता विभागात दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पुढील तपास इस्माईल शेख करत आहे.तर सदरील बाळ आजच बुधवारी जन्मलेले असल्याचा अंदाज असून,एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चार महिला रिक्षा मधून आल्याची चर्चा आहे.

सदरील बाळ अनैतिक संबधातून जन्मले असल्याने महिलेने काटेरी झुडपात टाकून दिले असावे असा संशय पोलिसांना आहे.