रावेरात निर्दयीपणे गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला

शहरातील नागरिकांच्या सतर्कतेने सुमारे ८० गायींसह गो-वंशाची सुटका
रावेरात निर्दयीपणे गोवंश वाहतूक करणारा ट्रक पकडला

रावेर - Raver - प्रतिनिधी :

येथे बुधवारी सायंकाळी गायीसह गोवंशाने भरलेला ट्रक निर्दयीपणे वाहतूक करताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे मिळून आल्याने,या प्रकरणी रावेर पोलिसात ट्रकचालक- मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस सुरू आहे.

तर यात कोंबून भरलेले जनावरे थेट जळगाव येथील रतनलाल बाफना यांच्या गो शाळेत संगोपनासाठी रवाना करण्यात आली आहे.

याबाबत प्राप्त झालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पालकडून उटखेडामार्गे खिरोद्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक आरजे ५२ जीए ५४१६ ट्रकमध्ये गायी भरल्याचा संशय काही तरुणांना आल्याने,याबाबत माहिती पोलिसांना दिली असता,सदरील ट्रक थेट पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला.

यात दोन कप्पे करून निर्दयीपणे पाय बांधून सुमारे ८० जनावरे वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले,यातील अनेक जनावरे गुदमरून मरण पावल्याचे अंदाज असून, याबाबत गो- प्रेमीकडून संतप्त भावना उमटत आहे.

ट्रक मधील सर्व जनावरे जळगांव येथील रतनलाल बाफना यांच्या गो शाळेत रवाना करण्यात आले आहे.ट्रक मालक उज्जैन येथील आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com