रावेरात संशयास्पद वावरणाऱ्या युपीतील 9 जणांवर पोलीस कारवाई

रावेर पोलीस स्टेशनच्या गुड मॉर्निंग पथकांची कामगिरी

रावेर - Raver - प्रतिनिधी :

शहरातील भोई वाड्यात संशयास्पद वावरत असलेल्या उत्तर प्रदेशातील ९ जणांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.पोलीस स्टेशनच्या गुड मॉर्निंग पथकाला हे लोक आढळून आले होते.

चौकशीतुन काहीही काम नसतांना वास्तव्य करत असल्याचे उघड झाल्याने,त्यांच्या तपासणीत हे सर्व जण रा.कैलाना जिल्हा शामली उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.त्यांच्या चारित्र्य पडताळणीसाठी त्यांच्या मूळ गावाच्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून त्यांची पार्श्वभूमी तपासली जात आहे.

याबाबत रावेर पोलिसांनी सिआरपीसी ११० प्रमाणे नोटीस बजावून कारवाई केली आहे.यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कोणतेही काम नसतांना या ठिकाणी त्यांचा राहण्याचा संबंध काय?संवेदनशील वस्तीत त्यांना आश्रय दिलेल्या घर मालकाने इथे राहण्याचे प्रयोजन विचारले नसेल का?किती दिवसापासून हे वास्तव्यास होते याबाबत अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे.

आढळून आलेले ९ जण गुन्हेगार वृत्तीचे आहेत का?ते इथे कारण नसतांना थांबण्याचा हेतू काय यासाठी त्यांच्या मूळ गावाच्या हद्दीतील पोलीस स्टेशन शी संपर्क करून,त्यांच्या बाबतीत माहिती मागवली असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी देशदूत शी बोलतांना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com