शेतकर्‍यांनी अडवुन ठेवलेले डंपर
शेतकर्‍यांनी अडवुन ठेवलेले डंपर |छाया-राजेश निकम
जळगाव

फेकरी येथे रस्तारोको

रस्ता दुरुस्तीची मागणी : कंपनी व प्रशासनाचे दुर्लक्ष

Ashish Patil

Ashish Patil

फेकरी ता.भुसावळ( वार्ताहर) Bhusawal

येथील शेतकर्‍यांनी वेपन कंपनीच्या गौण खनिज वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याबाबत कंपनी व प्रशासनाकडे तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांनी गौण खनिज वाहतूक करणारा डंफर अडवून कंपनीच्या विरोधात दि. ३ रोजी रास्ता रोको आंदोलन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने त्या ठिकाणी भरतीसाठी लागणारा (मुरूम) गौण खनिज साकरी व किन्ही शिवारातून वेपन प्रोजेक्ट कंपनीद्वारा फेकरी मार्गे रात्रंदिवस वाहतूक सुरु आहे. त्यामुळेे फेकरी ते साकरी डांबरी रस्त्याचे पावसाळ्यात अक्षरश: गाळणी झाल्याने या वाहतुकीमुळे रस्ता अजून खराब झाला आहे.

यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्याची परिस्थिती बघता रस्त्यावरील मोठे मोठे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले असून मोठाअपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकर्‍यांनी वारंवार वेपन कंपनीच्या मॅनेजरच्या विरोधात उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना तक्रार करून सुद्धा यावर अजून त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.

यामुळे शेतकर्‍यांना शेतातील मशागत करण्यात अडचण येत आहे त्यामुळे शेतकर्‍यांचे शेतमालाचे नुकसान होण्याची भीती निर्माण होत आहे. आज दि.३ ऑगस्ट रोज सकाळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गौण खनिज मुरूम वाहतूक करणार्‍या वाहनास अडवून शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

प्रशासनाने याविषयी दखल घेऊन लवकरात लवकर शेतकर्‍यांना व गावकर्‍यांना रहदारीसाठी वेपन कंपनीकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेण्याची मागणी परिसरातील शेतकरी व गावकर्‍यांनी केली आहे. लवकर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास वेपन कंपनीच्या विरोधात परिसरातील शेतकरी व गावकरी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. असे निवेदन उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना फेकरीचे सरपंच, माजी उपसभापती व गावकर्‍यांनी दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com