चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा अभियानाअंतर्गत तालुक्यातील हिरापूर येथे जलसंधारणाचे पुढचे पाऊल टाकत, भारतीय जैन संघटनेतर्फे मिळालेल्या पोकलॅन्ड मशीनद्वारे कोरोना संकटाच्या भिषण परिस्थितीत लोकसहभागातून नालाखोलीकरण व रुंदीकरणासाठी शेतकरी सरसावले आहेत.

तालुक्यातील हिरापूर येथे मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान अंतर्गत कामाचा शुभारंभ डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण (सहायुक्त, एऊ मुंबई) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना शेतकरी बांधवांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवायचा असेल तर लोकसहभागातून आपल्या शिवारात पडणारा थेंब आणि थेंब अडवून जमिनीत जिरवायला पाहीजे, यासाठी तालुक्यात गेली तीन वर्षापासून सुरू असलेल्या मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा अभियानअंतर्गत जलसंधारणाची कामे आपण स्वतः करुन घेतली पाहिजे असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

याप्रसंगी मिशन पाचशे कोटी लिटर्स जलसाठा अभियान टिमचे पाचपाटील सोमनाथ माळी, शेखर निंबाळकर, आर. एम. पाटील सर, शशांक अहिरे, एकनाथ माळतकर, सविता राजपुत, सुचित्रा पाटील यांनी मागील वर्षी केलेल्या कामाचे अनुभव सागितले. यावेळी हिरापूर येथील पं.स.सभापती अजय पाटील, संतोष निकुंभ, सुधिर शिंदे, सोमनाथ पाटील, आप्पासाहेब मराठे, उस्मान पठाण, भाईदास पाटील, संदिप शिंदे, भाऊसाहेब पांचाळ, भिकन देवरे, प्रदिप पाटील, सुरेश शिंदे, बुन्हाण पठाण, सलिम पठाण अकबर पठण, सुदाम निकुंभ, सुनिल निकुंभ, सुरेश देसले, गोपाल सोनवणे, पवन निकुंभ, हाशिम पठाण, अँड.पंकज देशमुख, प्रमोद शेळके आदि शेतकरी बांधव उपस्थित होते. टिमचे पाचपाटील प्रशांत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.