पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली रॅपिड टेस्ट

९७ निगेटिव तर तीन पॉझिटीव्ह
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली रॅपिड टेस्ट

पारोळा - प्रतिनिधी Parola

येथील पोलीस ठाणे आवारात पोलिस व पब्लिकचे रॅपिड टेस्ट करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, निलेश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रांजली पाटील, डॉक्टर सुनील पारोचे, यांच्या उपस्थितीत या टेस्ट करण्यात आल्या.

या कोरोणा टेस्टचे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पोलिस कर्मचारी, होमगार्ड, स्टॅम्प वेंडर व उपस्थित नागरिकांचे रॅपिड टेस्ट तपासण्यात आले या तपासणीत तीन जण पॉझिटिव्ह आले तर इतर 97 जण निगेटिव आल्याची माहिती डॉक्टर प्राजली पाटील यांनी दिली या तपासणीत डॉक्टर सुनील पारोचे, डॉक्टर सुनील पवार, हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते, कॉन्स्टेबल सुनिल पवार यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com