जळगावात धो-धो बरसला

जळगावात धो-धो बरसला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज जोरदार हजेरी लावली. सकाळपासून शहरात पाऊस सुरु असल्याने चाकरमान्यांची चांगलेच हाल झाले.

सायंकाळच्या सुमारास जोरदार मुसळधार पाऊसाला सुरुवात झाल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तसेच रस्त्यांवर प्रचंड चिखल झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यासह जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारली होती. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शेतकरी चिंचातूर झाला होता. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून सर्वत्र पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात झाल्याने नदी, नाले देखील वाहण्यास सुरुवा झाली आहे.

गुरुवारी सकाळपासून जळगाव शहरात पावसाने हजेरी लावली. दुपारी सुमारे तासभर रिमझीम पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाल्याने सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

या पावसामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

चिखलमय रस्त्यांनी नागरिक त्रस्त

शहरात अमृत व भुयारी गटारींचे काम सुरु असल्याने गल्लीबोळांसह मुख्य रस्ते देखील खोदण्यात आले आहे. आता पावसामुळे या रस्त्यांवर प्रचंड चिखल होत असल्याने वाहनचालकांसह दुचाकी चालकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. या चिखलामुळे शहरात छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहे.

सखोल भागात साचले पाणी

शहरात सकाळपासून पाऊस सुरु होता सायंकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील सखोल भागात पाणी साचले होते. यामध्ये नवीपेठ, न्यू बी. जे. मार्केट, बजरंग बोगदा, हरिविठ्ठलनगर या भागात पाणी साचले होते. तसेच अनेकांच्या घरात देखील पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com