जिल्ह्यात आज ‘दो बुंद जिंदगीके’ मोहीम

पावणेचार लाख बालकांना पल्स पोलिओ डोस; आरोग्य यंत्रणा सज्ज
जिल्ह्यात आज ‘दो बुंद जिंदगीके’ मोहीम

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील शून्य ते 5 वर्ष वयोगटातील 3 लाख 72 हजार 164 बालकांना 31 जानेवारी पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

त्यासाठी जिल्ह्यात 2 हजार 654 बूथ लावण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने पल्सपोलिओ मोहिमेची जय्यत तयारी केली आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांनी सांगितले.

सुरुवातीला 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या लसीकरणामुळे पल्सपोलिओ मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.

आता 31 जानेवारी रोजी जिल्ह्याभरात पल्सपोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. यंदा करोनाचे सर्व नियम पाळून कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जी बालके या लसीकरण मोहिमेतून सुटतील. अशा बालकांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत 6 हजार 838 घरांपर्यत पोहोचणार असून पालकांनी आपल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

शून्य ते 5 वयोगटातील बालकांना सर्व नियम पाळून पल्सपोलिओ मोहीम जिल्ह्याभरात राबविली जाणार आहे. यासाठी बुथ, कर्मचारी निश्चित करण्यात आले असून जिल्हा आरोग्य विभाग या मोहिमेसाठी सज्ज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com