धुळे | प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत कहर रोखण्यासाठी प्रशासनाने काल दि.१४ रोजी सांयकाळपासून लागू केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

नागरिकांनी घरातच थांबुन कफ्यूला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद होते. काल सायंकाळीपासून सहा वाजेपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याची स्वयंस्फुर्तीने नागरिक अंमलबजावणी करीत आहेत. दुध डेअरी, मेडिकल दुकाने दवाखाने, एसटी बसेस, खाजगी अत्यावश्यक प्रवासी वाहतुक वगळता सर्व काही बंद आहे.

दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ६ ते दि. १६ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू घोषीत केला. त्यानुसार काल सायंकाळपासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागु झाला आहे. सस्थानकाजवळ व हॉस्पिटल, मेडीकल जवळच काहीही गर्दी दिसून आली. अत्यावश्यक सेवेसाठीची खाजगी वाहतुक सुरू आहे. जनता कर्फ्यमुळे आज सकाळपासूनच पाचकंदिलसह आग्रारोड, साक्री रोड, चाळीसगाव रोड, देवपूर पसरातील रस्ते ओस पडलेले दिसून आले. एसपींनी केली पाहणी-जनता कर्फ्यू ९९ टक्के यशस्वी झाला असू व्यापार्यांसह नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्याचे पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी सांगितले.

त्यांनी सकाळी त्यांनी शहरातील आग्रा रोड, मोठा पुल परिरात भेट देवून पाहणी केली. शासकीय कार्यालय, कोवीड लसीकरण आणि दवाखाने सुरू असल्यामुळे काहीशी गर्दी दिसून येत आहे. विनामास्क व विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहे. कोरोना वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनेटायझरचा वापर करण्याससह गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.