भुसावळ प्रतिनिधी Bhusawal

वीज कंपनीच्या विज बीलांबाबतच्या विविध प्रश्नांबाबत विज कंपनी व तहसीलदार यांना भाजपाच्या वतीने आ. संजय सावकारे यांच्या नेतृत्वात १५ रोजी दुपारी ४ वाजता निषेध करुन निवेदन सादर करण्यात येणार आहे.

याबाबतच्या निवेदनात, शेतकर्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. वीज बिलावरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले वीज बिल भरण्यासाठी सवलत देणे. निम्मे वीजबिल भरण्यासाठी शेतकर्याकडे तगादा न लावणे. कोणतीही पूर्व सूचना न देता संपूर्ण डीपी बंद करून किंवा घरगुती वीज कनेक्शन तोडून शेतकरी व नागरिकांना त्रास न देणे.

या निवेदनावर राज्यातील महाआघाडी सरकारने निर्णय न घेतल्यास, शेतकर्यांना दिलासा न दिल्यास, आगामी कालखंडात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल व त्या आंदोलनाला राज्यातील हे शेतकरी विरोधी सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असा ईशारा देण्यात आला आहे.

राज्याच्या वीज मंत्र्यांनी वीजबिल १००टक्के माफ करू अशी घोषणा केली होती. पण ती पूर्ण केली नाही. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात येणार आहे. तरी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सक्रीय कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांनी उपस्थीत रहावे. असे आवाहन शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, दिलीप कोळी यांनी केले आहे.

तसेच ज्या शेतकर्यांना वाढीव वीजबीले आलेली आहेत त्यांनी दुपारी ४ वाजता येथील शासकीय विश्रामगृहात हजर राहण्याचे आवाहन भाजापाच्या वतीने करण्यात आले आहे.